अजपा योग - साधना आणि सिद्धी
संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक बिपीन जोशी यांच्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशू या पुस्तकांची संलग्न वेब साईट. या दोन्ही पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा योग विषयक अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

नुकतेच प्रकाशित झालेले लेख

ज्ञानेश्वरीतील कुंडलिनी योगाचा आस्वाद
उद्या म्हणजे दिनांक ८ सप्टेंबर २०२० रोजी श्रीज्ञानेश्वरी जयंती आहे. मराठी भाषिक माणसांना ज्ञानेश्वरीची वेगळी ओळख करून द्यायला नको. तुमच्यापैकी अनेकांनी ज्ञानेश्वरी वाचली असेल, तिचा अभ्यास केला असेल. कदाचित ज्ञानेश्वरीची विधिवत पारायणे सुद्धा तुम्ही केली असतील. त्यामुळे ज्ञानेश्वरीच्या रूढ वाचन-पठण-पारायण यांच्याविषयी मी काही सांगणार नाही. आपापल्या श्रद्धेनुसार तुम्ही ते करू शकता. वाचकांपैकी अनेक वाचक असे असतील की ज्यांनी अजूनपर्यंत ज्ञानेश्वरी कधीही पूर्णपणे वाचलेली नाही परंतु त्यांच्या मनात ज्ञानेश्वरी बद्दल कुतूहल आणि अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा आहे. अशा जिज्ञासू लोकांसाठी आज काही गोष्टी सांगत आहे. आशा आहे की त्यांचा उपयोग करून तुम्ही ज्ञानेश्वरीतील मार्गदर्शन अधिक चांगल्या प्रकाराने अंगिकारू शकाल.
Posted On : 07 Sep 2020
मुक्तिका उपनिषद आणि अजपा ध्यान - भाग ३
मागील दोन भागांत आपण प्रामुख्याने मुक्ती विवरण आणि साधन चतुष्टय या विषयी जाणून घेतले. आता कैवल्य मुक्तीच्या अभिलाषी मुमुक्षुने साधनेची कास कशा प्रकारे करावी त्याचे मार्गदर्शन "मुक्तिका" करत आहे. त्याच अनुषंगाने प्राण, अपान, मन, अमनस्क योग, अजपा, केवल कुंभक वगैरे गोष्टींचा एकमेकाशी कसा अद्भुत मेळ बसतो ते ही आपण जाणून घेणार आहोत.
Posted On : 24 Aug 2020
मुक्तिका उपनिषद आणि अजपा ध्यान - भाग २
मागील भागात आपण प्रभू श्रीरामांच्या मुखातून मुक्तीचे पाच प्रकार कोणते ते ऐकले. सालोक्य, सामीप्य, सारुप्य आणि सायुज्य या चार प्रकारांपेक्षा कैवल्यमुक्ती श्रेष्ठतम आहे हे ही आपण पाहिले. कैवल्यमुक्ती हस्तगत करण्याचा मार्ग म्हणून उपनिषद प्रणीत ज्ञानमार्ग "मुक्तीकेने" आपल्याला सांगितला आहे. मुक्तीच्या प्रथम चार श्रेण्या ह्या मानवाला त्याच्या पाप-पुण्यादी कार्मांनुसार मानवी देह सांडल्यानंतर प्राप्त होणाऱ्या आहेत. कैवल्यमुक्ती ही ह्याच देहात जिवंतपणी अनुभवायची आहे आणि म्हणूनच ती श्रेष्ठ आहे.
Posted On : 17 Aug 2020
मुक्तिका उपनिषद आणि अजपा ध्यान - भाग १
भारतीय अध्यात्मात वेदांना अनन्यसाधारण महत्व आहे. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद असा वेदज्ञानाचा वटवृक्ष अध्यात्माचा प्रधान स्त्रोत आणि मानबिंदू आहे. जाणकारांनी वेदांतील ज्ञानाची विभागणी कर्मकांड, उपासना कांड आणि ज्ञानकांड अशी केलेली आहे. त्यांतील ज्ञानकांड हा विशेष महत्वाचा भाग आहे कारण आध्यात्मिक साधनेची सांगता ब्रह्मज्ञानातच आहे. तेंव्हा आत्मा, आत्मज्ञान, ब्रह्म, ब्रह्मज्ञान, मुक्ती, मोक्ष वगैरे उच्च कोटीच्या गोष्टींचा निर्देश आणि उहापोह ज्ञानकांडात केलेला आहे. अशा या ज्ञानकांडात प्रामुख्याने उपनिषदांचा समावेश होतो.
Posted On : 10 Aug 2020
तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु
सर्व योगाभ्यासी वाचक आपापल्या आवडीच्या श्रावणातील उपासनेमध्ये नक्कीच व्यग्र असणार. उपासना म्हटली की ती तीन प्रकारची असू शकते - नित्य, नैमित्तिक आणि काम्य. आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलेली ती नित्य उपासना. तुमच्यापैकी अनेकजण रोज नेमाने जप, स्तोत्रपाठ, ध्यान-धारणा वगैरे करत असतील ती सगळी उपासना नित्य उपासना झाली. काही उपासना ह्या विशिष्ठ प्रसंगी केल्या जातात.
Posted On : 03 Aug 2020
भगवान शंकराच्या अष्ट संहारमूर्ती
निरनिराळ्या देवी-देवतांनी असुरांचा आणि दुष्टांचा संहार करणे ही पौराणिक काळातल्या साहित्यात हमखास आढळणारी गोष्ट. ज्याचे प्रधान कर्मच मुळी संहार आहे तो भगवान शंकरही त्याला अपवाद नाही. शिवपुराणात आणि भगवान शंकराशी संबंधित साहित्यात अशा प्रकारच्या विपुल कथा आपल्याला आढळतात. या सर्व कथांमधील आठ संहाराचे प्रसंग विशेष महत्वाचे मानले जातात. दक्षिणेत विशेषतः तामिळनाडू प्रदेशात तर या प्रसंगाना समर्पित असलेली भगवान सदाशिवाची "संहारमूर्ती" स्वरूपातील मंदिरे आहेत.
Posted On : 27 Jul 2020
श्रावणातील अजपा जप
पुढील आठवड्यात आपल्याकडे श्रावण मास सुरु होत आहे. एकूणच या काळात बरेच सण येत असले तरी श्रावण खऱ्या अर्थाने भगवान शंकराचा महिना आहे. श्रावणातील शिवोपासनेची लज्जत काही औरच असते. तसं कोरड्या तर्काने बघायचं झालं तर कोणत्याही देवतेच्या भक्ती करता, उपासने करता कोणत्या मुहूर्ताची गरज नसते. मनात श्रद्धा आणि भक्ती असली की झाले. एका तोंडाने म्हाणायचे की परमेश्वर सदासर्वकाळ सृष्टीच्या कणाकणात ओतप्रोत भरलेला आहे आणि दुसऱ्या तोंडाने म्हणायचं की अमुक एका महिन्यात तो लवकर प्रसन्न होतो. वरकरणी हा विरोधाभास वाटणे स्वाभाविक आहे.
Posted On : 13 Jul 2020
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने...
आज ५ जुलै २०२० रोजी गुरुपौर्णिमा आहे. आधुनिक काळात गुरुचे आणि शिष्यांचे स्वरूपही बदलले आहे. आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे भौतिक ज्ञानाची व्याख्या आणि कक्षा विस्तारित झाली आहे. ज्ञान जतन करण्याचे आणि प्रसारित करण्याचे अनेकानेक प्रकार आज उपलब्ध झालेले आहेत. आधुनिक भोगवादी जीवनशैलीचा प्रचंड रेटा सर्वच स्तरांवर सहन करावा लागत आहे. अशा वेळी गुरु-शिष्य स्वरूप आणि संबंध यांत कालसापेक्ष बदल न घडतील तरच नवल.
Posted On : 05 Jul 2020
योगसाधनेला पोषक सहा गुण
कोण्या एका गावात एक सोनार आपल्या पत्नी आणि मुलांसह रहात होता. एक दिवस नेहमी प्रमाणे तो आपल्या दैनंदिन कामकाजात व्यग्र होता. दुपारच्या जेवणाच्या वेळी काही निवांत क्षण अनुभवत असतांना जणू चमत्कार घडला. त्या सोनाराची जीभ अचानक उचलली गेली आणि टाळूला घट्ट चिकटली आणि त्याला खेचरी मुद्रा लागली. डोळे उफराटे होऊन शांभवी मुद्रा लागली. तो देहभान विसरला.
Posted On : 15 Jun 2020
अजपा साधकांसाठी पंचीकरण रहस्य
म्हणता म्हणता पावसाळा येऊन ठेपला आहे. उकाडा कमी होऊन हवामान जरा सुखकारक बनले आहे. पहाटे-पहाटे पक्ष्यांची ऐकत राहावीशी वाटणारी किलबिल आता कानावर पडू लागली आहे. थंड पावसाळी हवेची हवीहवीशी वाटणारी झुळूक शरीर-मन सुखावून जात आहे.
Posted On : 08 Jun 2020

देवाच्या डाव्या हाती
कशी होते कुंडलिनी जागृती? जागृती नंतर पूढे काय? प्राचीन योगग्रंथात उल्लेखलेले अनुभव आजही खरोखरच येतात का? या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारे अनुभव कथन. एक नवखा साधक ते योगी या प्रवासात लेखकाला आलेल्या अडचणी आणि त्याने मोठ्या जिद्दीने त्यांवर केलेली मात याचे प्रभावी वर्णन या पुस्तकात आढळते. लेखक बिपीन जोशी यांचे विस्मयकारक स्वानुभव आणि प्रभावी मार्गदर्शन. अधिक वाचण्यासाठी येथे जा.
नाथ संकेतींचा दंशु
कुंडलिनी योगमार्ग विनाकारण गुढतेच्या आणि क्लिष्टतेच्या वलयात झाकोळला गेला आहे. सर्वसामान्य संसारी साधक कुंडलिनी योगमार्गापासून दूरच राहिला आहे. सर्वसामान्य साधकाला समजतील, जमतील आणि फायदा मिळवून देतील अशी मूलतत्वे आणि साधना यांचे सहज सोप्या भाषेत विश्लेषण करणे हे या पुस्तकाचे मुख्य उद्दीष्ट आहे. लेखक बिपीन जोशी यांचे प्रभावी आणि स्वानुभवाधिष्ठित मार्गदर्शन. अधिक माहितीसाठी येथे जा.

Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates