योग - अध्यात्म

12345678910...Last
कार्तिक स्वामी जन्माचे लज्जागौरी कनेक्शन
आज त्रिपुरी पौर्णिमा अर्थात कार्तिक पौर्णिमा आहे. आजच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला होता. ती कथा सुप्रसिद्धच आहे. त्यामुळे त्याच्या खोलात जात नाही. आजच्या दिवशी भगवान शंकराची उपासना तर करतातच परंतु त्याचबरोबर कार्तिकस्वामीची उपासना सुद्धा करतात.
Posted On : 12 Nov 2019
हिवाळ्यातील अजपा कुंडलिनी साधना
या वर्षी पाऊस फारच लांबलेला आहे. त्यामुळे ऋतूचक्र काहीसं विस्कळीत झालेलं आहे. हळूहळू थंडीची चाहूल लागेल अशी आशा करूयात. त्याच अनुषंगाने हिवाळ्यात अजपा कुंडलिनी साधना करणाऱ्या योगसाधकांनी काय काळजी घ्यावी त्याबद्दल काही गोष्टी आजच्या या लेखात सांगणार आहे. मुद्दामच हिवाळा सुरु होण्याच्या आगोदर ह्या गोष्टी सांगतोय म्हणजे ज्यांना कराव्याशा वाटतील त्यांना तयारी करायला पुरेसा अवधी मिळेल.
Posted On : 04 Nov 2019
त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक
भारतीय अध्यात्मशास्त्रात वेगवेगळ्या गद्य आणि पद्य ग्रंथांत हंस पक्षाचे रूपक वापरलेलं आहे. हंस पक्षी हा मुळातच राजबिंडा आहे. पांढरा शुभ्र रंग, काहीशी नाजूक, लवचिक पण भक्कम मान, बहारदार पंख असं त्याचं रूप कोणालाही मोहून टाकेल असंच आहे. प्राचीन भारतीय ऋषीमुनींना आणि योग्यांनाही त्याच्या रूपाचं आकर्षण वाटत आलेलं आहे आणि त्यांनी त्याला अध्यात्मशास्त्रात बेमालूमपणे गुंफलेल आहे.
Posted On : 28 Oct 2019
दिवाळीच्या रात्री कुंडलिनी साधना
भारतीय अध्यात्मशास्त्रात मंत्रमय उपासनेला आत्यंतिक महत्व आहे. मूळ आगम-निगम शास्त्रात उगम असलेळ्या मंत्रशास्त्राचे महत्व ओळखून भगवान शंकराने सात्विक मंत्र आणि योग याची जुंपणी मंत्रयोगात केली. मंत्र म्हटला की त्याचा जप हा ओघाने आलाच आणि जप म्हटलं की त्यांद्वारे मंत्रातील चैतन्याची जागृतीही ओघाने आलीच. हठयोग किंवा राजयोगाच्या तुलनेत मंत्रयोग काहीसा मंदगतीचा मार्ग आहे. त्यामुळेच मंत्राचे जेंव्हा हजारो-लाखो वेळा विधीविधानासाहित उच्चारण करावे तेंव्हा कुठे तो सिद्ध होतो. यात लागणारा वेळ लक्षात घेता प्राचीन योग्यांनी काही असे उपाय शोधून काढले की ज्यांमुळे मंत्रसिद्धी शीघ्रगतीने होण्यास मदत मिळेल.
Posted On : 21 Oct 2019
कुंडलिनी शक्तीत दशमहाविद्यांचे एकीकरण
आठवड्या-दोन-आठवड्यात नवरात्र सुरु होणार आहे. नवरात्र म्हटलं की देवीची विविध रूपांत उपासना ही ओघाने आलीच. शक्ती उपासनेत आदिशक्तीची उपासना दहा स्वरूपांत करण्याची प्रथा पाचीन काळापासून सुरु आहे. ही दहा स्वरूपे कोणती तर काली, तारा, छिन्नमस्ता, षोडशी, भुवनेश्वरी, त्रिपुरभैरवी, धूमावती, बगलामुखी, मातंगी आणि कमला.
Posted On : 16 Sep 2019
हठयोगातील बालविधवा आणि कुलवधू
प्राचीन योगाग्रंथांची खासियत ही आहे की त्यांत योग विज्ञान तर ओतप्रोत भरलेलं आहे परंतु ते अशा भाषेत प्रस्तुत केलेलं आहे की सर्वसामान्य माणसाच्या पकडीत ते सापडू नये. याला गोपनीयता म्हणा किंवा काव्यात्मकता म्हणा किंवा क्लिष्टता म्हणा पण ती योगग्रंथांचा अविभाज्य घटक बनलेली आहे. कुंडलिनी योगमार्गावरून वाटचाल करू इच्छिणाऱ्या साधकाला कधी ना कधी या गुढरम्य भाषेचा सामना करावा लागतो. त्यावेळेस ही भाषा एकतर त्याला स्वतःला एखादं कोडं सोडवल्याप्रमाणे decode करावी लागते किंवा एखाद्या जाणकार माणसाकडून ती समजून घ्यावी लागते. आजच्या या लेखात अशी दोन उदाहरणे पाहुया.
Posted On : 09 Sep 2019
अजपा साधनेतील घाम, कंप आणि स्थैर्य
हठयोगात कुंभकयुक्त प्राणायाम हा आत्यंतिक महत्वाचा घटक मानला जातो. परंतु कुंभकयुक्त प्राणायाम ही सगळ्यांना साधणारी गोष्ट नाही. या उलट अजपा साधना सगळ्यांना सहज साधणारी आहे. आज अजपा साधनेत प्राणमय कोषाची शुद्धी व्हायला सुरवात झाली की काय काय अनुभव साधकाला येतात ते थोडक्यात सांगणार आहे.
Posted On : 26 Aug 2019
प. प. वासुदेवानंद सरस्वती महाराजांचे योगरहस्यम आणि मंत्रविधानम
परमपिता परमेश्वर मानवजातीच्या कल्याणासाठी वेळोवेळी संत-सत्पुरुष निर्माण करत असतो. त्यातही किती वैविध्य असते पहा. कधी तो श्रीगोरक्षनाथांसारखा हठयोग पंथी सिद्ध घटीत करतो तर कधी आदी शंकराचार्यांसारखा ज्ञानमार्गी जगद्गुरू पृथ्वीतलावर धाडतो. कधी तो श्रीगजानन महाराज, श्रीस्वामी समर्थ यांसारखे अवधूत वृत्ती जोपासणारे स्वच्छंदी सत्पुरुष निर्माण करतो तर कधी श्रीशंकर महाराजांसारखे अवलिया योगी. व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाला अनुसरून तो समाजातील सर्व प्रकारच्या लोकांचा उद्धार कसा होईल ते पहात असतो.
Posted On : 19 Aug 2019
कुंडलिनी योग क्रियांमधील पशुभाव, वीरभाव आणि दिव्यभाव
कुंडलिनी योग हा एक अथांग सागर आहे. एक-दोन डुबक्या मारून त्यातील बहुमुल्य मोती प्राप्त होतील अशी अपेक्षा करणे बरोबर ठरणार नाही. त्यासाठी श्रद्धा, सबुरी, शिस्त आणि समर्पण या चतुःसूत्रीवर आधारित आयुष्यभराची उपासना करण्याची जिद्द आणि चिकाटी हवी. आज या सागरातील अशाच एका काहीशा गोपनीय गोष्टीविषयी सांगणार आहे. गोपनीय अशासाठी म्हणतोय कारण प्राचीन योगग्रंथांत याविषयी स्पष्ट काहीच उल्लेख नाही. केवळ संकेतमात्र आहे.
Posted On : 12 Aug 2019
या जिभेचे काय करायचे?
या लेखाचे शीर्षक वाचून कदाचित तुम्हाला असे वाटेल की जिभेचे चोजले पुरवण्यावर किंवा वायफळ बडबडीवर काही आहे की काय. नाही. त्या विषयी नाही. थोडी वेगळी गोष्ट आहे. सर्वसाधारण माणूस कोणी डोळे मिटून मांडी घालून बसला की त्याच्या कडे बोट दाखवून म्हणतात की हा ध्यान करत आहे. परंतु ध्यानाचा अभ्यासक असलेल्या व्यक्तीलाच माहित असतं की त्याच्या अंतरंगात नक्की काय सूक्ष्म योगगम्य गोष्टी घटीत होत आहेत.
Posted On : 29 Jul 2019
12345678910...Last

Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates