Learn the royal path of Ajapa Yoga. Course conducted by Bipin Joshi in Thane. Read more...

Untitled 1

संचित संस्कार आणि जगदाभास

पूर्वी कधीतरी वाचलेली एक गोष्ट आठवली...

एका निर्जन रस्त्याच्या कडेला एक लाकडाचा मोठा ओंडका पडला होता. संध्याकाळ झाली, प्रकाश आणि सावल्यांचा खेळ सुरु झाला.

दुरून तो ओंडका पाहिल्यावर कोणाच्या मनात काय आलं ते पहा -

१. आपल्या प्रेयसीची भेट घेण्यास निघालेल्या एका प्रियकराला वाटलं की तो ओंडका म्हणजे त्याची प्रेयसीच आहे. तो मोठ्या आतुरतेने वाट चालू लागला.
२. एका लहान मुलाला वाटलं की तो ओंडका म्हणजे भूत आहे. तो घाबरून जोराने किंचाळू लागला.
३. एका चोराला वाटलं की तो ओंडका म्हणजे रखवालदार आहे. तो वेगाने पळून जाऊ लागला.
४. एका संन्याशाला वाटलं की तो ओंडका म्हणजे छोटे देऊळ आहे. तो प्रसन्न चित्ताने वाट कापू लागला.

तात्पर्य हे की माणसाच्या मनात जे संस्कार साचले आहेत ते संधी मिळताच घटीत होतात. एका जन्मीच्या संस्कारांची ही कथा तर जन्मोजन्मींच्या संस्कारांचे काय सांगावे. हे संस्कारच जन्म-मृत्यूची न संपणारी साखळी निर्माण करत असतात.

योग मतानुसार देवात्म शक्ती जागृत झाल्यावर संस्कार क्षीणता प्राप्त होते. संत ज्ञानेश्वरांच्या शब्दांत सांगायचं तर समस्त संचित संस्कारांची आटणी करण्याची मूस म्हणजे जगदंबा कुंडलिनी... आणि कुंडलिनी जागृतीचा एक सुलभ, सुखमय मार्ग म्हणजे "नाथांची अजपा".


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग मार्गदर्शक आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून अजपा योग विषयक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 07 Dec 2017