Untitled 1
योग म्हणजे...
स्वतःच स्वतःची गळाभेट घेणं म्हणजे योग.
त्रिगुणांची वस्त्रे फेडून आत्म्याला सहज स्थितीत पहाणं म्हणजे योग.
जन्मोजन्मींचे संस्कार धुवून निजबोध घेणं म्हणजे योग.
वेदवाक्यांची सत्यता वेद न वाचताच पटणं म्हणजे योग.
पंचभूतांची आटणी करून सुखमय तुर्या भोगणं म्हणजे योग.
पिंड जाणून ब्रह्मांड उलगडणं म्हणजे योग.
विश्वात विश्वंभर आणि विश्वंभरात विश्व दृगोचर होणं म्हणजे योग.
आयुष्यभराच्या उपाध्या पिकल्या पानाप्रमाणे गळून पडणं म्हणजे योग.
प्रणवाचा धीरगंभीर अनाहत ऐकणं म्हणजे योग.
सृष्टीच्या कणाकणातील चैतन्याचा उद्घोष जाणवणं म्हणजे योग.
आयुष्याचा प्रत्येक क्षण सहजसाक्षी बनून जगणं म्हणजे योग.
~ बिपीन जोशी
हा लेख कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित आहे. कृपया कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रित करू नये.
प्रिय वाचकांनो,
गेली अनेक वर्षे आम्ही आमच्या वेब साईटच्या माध्यमातून योग-अध्यात्म विषयक लेखन प्रसिद्ध करत आहोत.
आम्ही कोणालाही आमचे लेखन अन्यत्र पुनर्मुद्रित करण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिलेली नाही.
तरीही काही लोकांनी आमचे लेखन अन्यत्र (उदा. फेसबुक पेज, व्हॉटस अॅप, ब्लॉग वगैरे) प्रकाशित केल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.
मूळ लेखकाचे नाव आणि या वेब साईटचा दुवा देण्याचे सौजन्यही त्यांनी दाखविलेले नाही.
काहींनी तर आमचे लेखन आपल्या स्वतःच्या नावे प्रसिद्ध केले आहे.
या लोकांनी केलेले हे साहित्य चौर्य अर्थातच निंदनीय आणि खेदजनक आहे.
योग्य वेळ येताच भारतीय कायदा आपले कार्य करेलच परंतु आम्ही आमच्या सुजाण वाचकांना हे सूचित करू इच्छितो
की त्यांनी अशा साहित्य चोरांपासून सावध रहावे.
अशा लोकांशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. ही वेब साईट हे आमचे लेखन प्रसिद्ध होण्याचे एकमेव अधिकृत स्थान आहे.
आम्ही अन्य कोणालाही आमचे लेखन प्रसिद्ध करण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिलेली नाही.
धन्यवाद.
~ वेब टीम