Untitled 1
वेब साईटच्या वाचकांशी संवाद - जून २०१५
प्रिय वाचकांनो,
जून महिना सुरू झाला म्हणजे पावसाचे वेध लागतात. पावसाळ्यात वातावरण असे असतं की
एकीकडे उन्हाळ्यापासून सुटका झाल्यानं मन प्रफुल्लित झालेलं असतं तर दुसरीकडे दमट
हवा, चिखल आणि रोगराई यामध्ये वाढ झालेली असते. हा हो ऋतु बदलाचा कालखंड असतो तो
शरीरासाठी थोडा त्रासदायकच असतो. हवामानातील बदलाला जुळवून घेण्यासाठी शरीराची कसरत
सुरू असते. शरीरात साठलेला आम रोग-व्याधींवाटे बाहेर टाकला जातो. याच कारणास्तव
आयुर्वेदात ऋतुमानानुसार आहारातही बदल करण्याचा सल्ला दिलेला आहे. मनानी कितीही
हट्ट केला तरी गरमागरम भजी किंवा बटाटावडा असे पदार्थ हे थोड्या प्रमाणात खाणेच
श्रेयस्कर आहे. हठयोगमध्ये नेती, धौती सारख्या ज्या शुद्धीक्रिया आहेत त्यांचा
अशावेळी खूप उपयोग होऊ शकतो. पावसाळ्यात सूर्यनमस्कार आणि योगासने नेहमीपेक्षा थोडी
वाढवण्यास हरकत नाही.
अजून सहा दिवसांनी म्हणजे रविवार दिनांक २१ जून २०१५ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत आहे. त्यानिमित्ताने होणारी
उलट-सुलट, चांगली-वाईट चर्चाही तुम्ही सगळेजण वर्तमानपत्रातून वाचतच असाल. एक योग
साधक म्हणून आपण इतकेच करायचे हे की आयुष्यातील प्रत्येक दिवस "योग दिन" म्हणून
जगायचा आहे हा संकल्प या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दृढ करायचा आहे.
लोकं रक्षाबंधन किंवा भाऊबीज यांसारखे सण एकच दिवस साजरे करतात. परंतु याचा
अर्थ अन्य दिवशी भावा-बहीणींमधील प्रेम आटले असा होत नाही. तो दिवस केवळ मूळ
उद्दिष्ट अधिक दृढ व्हावे म्हणून साजरा केला जातो. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय योग दिन
सत्कारणी लागो ही सदिच्छा.
आता वाचकांच्या निवडक प्रश्नांकडे वळूया...
प्रश्न
महोदय,
मी आपली वेब साईट वाचली. आपण छान माहिती दिली आहे. मी ध्यान साधना शिकलो आहे. मला
ध्यान करता येते. परंतु मला कुंडलिनी जागृती विषयी माहिती किवा पुस्तक हवी आहे.
कृपया आपण मला या विषयी मदत करावी ही विनती.उत्तर
आमची वेब साईट वाचल्याबद्दल आणि ती आवडल्याचे सांगितल्याबद्दल धन्यवाद.
योगशास्त्राचा कोणताही प्रकार असो (मंत्रयोग, हठयोग, लययोग, राजयोग) त्यांतील
साधनेची परिणीती ही कुंडलिनी जागृतीत होतेच. मग तुम्हाला कुंडलिनी शक्तिविषयी काही
माहिती असो किंवा नसो. अर्थात कुंडलिनी शक्तिविषयी माहिती असणे केंव्हाही चांगलेच.
कारण जेंव्हा निरंतर साधनेद्वारे कुंडलिनी शक्ति जागृत होते तेंव्हा येणार्या
अनुभवांविषयी साधकाला पूर्वकल्पना असते. कुंडलिनी शक्तिविषयी काहीच माहिती नसेल तर
आपल्याला येणार्या अनुभवांविषयी साधकाचा गोंधळ उडू शकतो.
प्राचीन सिद्ध योग्यांच्या परंपरेत साधकाला तयार केले जात असे. हठयोगातील आसने,
मुद्रा, बंध हे सगळे या तयारीचाच भाग आहेत. तुम्ही ध्यानयोग शिकला आहात आणि साधनारत
आहात हे चांगलेच आहेत. परंतु मी असे सुचवीन की त्या जोडीला शरीरशुद्धी साठी
हठयोगातील काही सोप्या क्रिया तुम्ही कराव्यात. कुंभकरहित अनुलोम-विलोम, उज्जाई हे
प्राणायाम आणि मोजकी आसने शक्य असल्यास जरूर करावीत. मनोमय कोष आणि विज्ञानमय कोष
हे ध्यानयोगाचा प्रमुख विषय असले तरी या दोन्ही कोषांचा पोत अन्नमय कोष आणि प्राणमय
कोष यांच्या सुद्धतेवर अवलंबून आहे. हठयोगाने अन्नमय कोष आणि प्राणमय कोष शुद्ध
झाल्यावर ध्यानमार्गावर पटकन प्रगति करता येते. असो.
जर कुंडलिनी योगमार्गाविषयी अधिक माहिती मिळवण्याची तुमची इच्छा असेल तर
आमच्यातर्फे प्रकाशित झालेली
देवाच्या डाव्या हाती आणि
नाथ संकेतींचा दंशू ही दोन पुस्तके करूर वाचा. त्यात कुंडलिनी, चक्रे, प्राण,
नाड्या, शैव दर्शन, नाथ संप्रदायोक्त विचारधारा इत्यादि अनेक गोष्टी समजावून
सांगितलेल्या आहेत. या वेब साईटवरही याविषयी बरीच माहिती दिलेली आहे.
जगद्नियंता श्रीकंठ तुम्हाला योग्य मार्ग दाखवो ही सदिच्छा.
Question
I have experiences of Kundalini awakening. Some time my mind
stops thinking. I experience kriyas some time. But I have not seen any drishtant,
vision in my meditation. I go for satsang where I listen other Yogis tell about
drishtant, experience they have in meditation. Lots of time they see light, sun
etc. in their meditation. But I don't have such type of experience. I am
meditating for the last seven years. Is it because I am missing something? What
is wrong with me? Can you please tell me reason behind this?
Answer
Nothing wrong with you. But your attitude towards spiritual progress needs to
be corrected. You haven't specified your sadhana or lineage but it is good that
your Kundalini is awakened and you are experiencing kriyas. This itself is an
indicator that the Shakti is working. She is doing Her job.
Each and every sadhaka is different and so are their experiences. Post
awakening what course of action Shakti should take is totally dependent on your
past samskaras, current purity of mind-body equipment and Her will. You simply
don't have any idea about this aspect of your personality. So, stop comparing
your symptoms of awakening with others. Seeing light, lotuses, flowers or sun /
moon are some of the common signs. But that doesn't mean they are the only signs
of awakening. Many a times the signs are so subtle in nature that you fail to
identify them in your day to day life. What is more important for you is to
check whether you feel at peace with yourself, whether your sadhana makes you
happy and how you feel about your life in general.
Additionally, reflect upon your lifestyle to check whether unknowingly or
knowingly you are violating any yama-niyama of yoga. As per your description
your Shakti is already active and you are experiencing kriyas. Make sure not to
put any obstacles in the path of Shakti in the form of improper diet or wrong
lifestyle. Use experiences of other yogis only as a guideline or motivation.
May Lord Shreekantha show you the right direction.
प्रश्न
नमस्कार सर,
मी अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मी
आपले लेख वाचत आहे. अमेरिकेतीलच एका स्थानिक योगा स्टुडिओ मधून
मी हठयोग आसने शिकलो आहे. मला आता कुंडलिनी योग करायचा आहे. त्यासाठी कोणती आसने
करावीत? कृपया या विषयी माहिती द्यावी.
उत्तर
सर्वप्रथम मी असे सांगीन की तुम्हाला कुंडलिनी योग का करायचा आहे ते मनाशी नीट
पडताळून पहा. मगच या मार्गावर पाऊल टाका. त्याचं कारण असं की पाश्चात्य देशांत
हठयोग हा प्रामुख्याने शारीरिक व्यायाम म्हणूनच शिकवला जातो. कुंडलिनी योगाचे
उद्दीष्ट त्यापेक्षा फार मोठे आणि वेगळे आहे. तुमचे या मार्गावर येण्याचे उद्दीष्ट
आणि कुंडलिनी योगाचे उद्दीष्ट यात तफावत नाही ना याची खातरजमा करावी.
एकदा का तुम्ही या मार्गावर येण्याचे ठरवले की साधना ओघाने आलीच. कुंडलिनी
योगमार्गावर अक्षरशः खंडीभर साधना आहेत. मंत्रयोग, हठयोग, लययोग आणि राजयोग अशा चार
मार्गामध्ये त्यांची विभागणी केली जाते. तुम्ही हठयोगाची आसने शिकला आहात त्यामुळे
मी असे सांगीन की तुम्ही जप, अजपा, सूर्यनमस्कार आणि मोजकी योगासने करावीत. योगासने
निवडताना पाठीच्या कण्याला पुढे, मागे आणि दोन्ही बाजूंना बाक देणारी आसने
निवडावीत. काही महिन्यांपूर्वी मी नवीन साधकांसाठी एक योगासनांचे रुटीन दिले होते.
ते ही तुम्ही
येथे वाचू शकता. या वेब साईटवर अजपा साधनेची माहिती दिलेली आहे. ती नीट वाचावी
आणि त्याप्रमाणे साधनारत व्हावे.
जगद्नियंता श्रीकंठ तुम्हाला योग्य मार्ग दाखवो ही सदिच्छा.
हा लेख कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित आहे. कृपया कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रित करू नये.
प्रिय वाचकांनो,
गेली अनेक वर्षे आम्ही आमच्या वेब साईटच्या माध्यमातून योग-अध्यात्म विषयक लेखन प्रसिद्ध करत आहोत.
आम्ही कोणालाही आमचे लेखन अन्यत्र पुनर्मुद्रित करण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिलेली नाही.
तरीही काही लोकांनी आमचे लेखन अन्यत्र (उदा. फेसबुक पेज, व्हॉटस अॅप, ब्लॉग वगैरे) प्रकाशित केल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.
मूळ लेखकाचे नाव आणि या वेब साईटचा दुवा देण्याचे सौजन्यही त्यांनी दाखविलेले नाही.
काहींनी तर आमचे लेखन आपल्या स्वतःच्या नावे प्रसिद्ध केले आहे.
या लोकांनी केलेले हे साहित्य चौर्य अर्थातच निंदनीय आणि खेदजनक आहे.
योग्य वेळ येताच भारतीय कायदा आपले कार्य करेलच परंतु आम्ही आमच्या सुजाण वाचकांना हे सूचित करू इच्छितो
की त्यांनी अशा साहित्य चोरांपासून सावध रहावे.
अशा लोकांशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. ही वेब साईट हे आमचे लेखन प्रसिद्ध होण्याचे एकमेव अधिकृत स्थान आहे.
आम्ही अन्य कोणालाही आमचे लेखन प्रसिद्ध करण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिलेली नाही.
धन्यवाद.
~ वेब टीम