Online Course : Kriya and Meditation for Software Developers || Build your personal meditation routine step-by-step for calm and clear mind, improved focus, and blissful inner connection.

Untitled 1

आंतरराष्ट्रीय योग दिन २०२२

आज सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिन २०२२ साजरा होत आहे. तुम्ही सर्व सुजाण वाचक मंडळी आपापल्या आवडीनुसार आणि श्रद्धेनुसार तो साजरा करत असाल याची मला खात्री आहे. तुम्हा सर्वाना त्यासाठी खुप साऱ्या शुभेच्छा.

आधुनिक इंटरनेट युगात योगासने, प्राणायाम, ध्यान, कुंडलिनी योग, चक्रे वगैरे वगैरे गोष्टी आता घराघरात पोहोचल्या आहेत. पूर्वी जे ज्ञान मोजक्या लोकांनाच अवगत होते ते आज सर्रास सगळ्यांना उपलब्ध झाले आहे. अनेक योगप्रेमी शारीरिक आणि मानसिक "फिटनेसच्या" स्वरूपात त्यापासून लाभान्वितही होत आहेत.

एक गोष्ट असते ज्ञानाची उपलब्धता आणि दुसरी गोष्ट असते ज्ञानाची प्रत्यक्ष अनुभूती. आज योगज्ञानाची उपलब्धता जरी सहजप्राप्य झाली असली तरी त्या ज्ञानाची योगशास्त्राला अपेक्षित असलेली प्रत्यक्ष अनुभूती घेतलेले योगसाधक संख्येने अत्यल्पच आहेत. सर्व अध्यात्ममार्गी मुमुक्षु योगसाधकांनी त्याविषयी अंतर्मुख होऊन विचारमंथन करण्याची गरज आहे.

या वर्षी योग दिनाची थीम आहे - मानवतेसाठी योग. हे उद्दिष्ठ साध्य होण्यासाठी योगशास्त्राला "फिटनेस" पुरते मर्यादित न ठेवता त्या पलीकडे जाऊन मानवी जीवनाचा सर्वंकष विचार करणाऱ्या व्यापक प्रणालीच्या स्वरूपात पहाण्याची गरज आहे. आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान, आधुनिक जीवनशैली आणि प्राचीन योगशास्त्र यांत ताळमेळ बसवणे काहीसे कठीण भासत असले तरी त्यांचा उपयोग कालसापेक्ष योगजीवनाचा अंगीकार करण्यासाठी कसा करता येईल याकडे लक्ष दिल्यास अधिक फायदेशीर ठरेल. योगशास्त्राविषयीची उथळ भूमिका टाकून योगशास्त्राच्या ज्ञानगर्भ गाभ्यात कसे शिरता येईल याचा विचार या निमित्ताने सर्व योगाभ्यासी नक्कीच करतील अशी आशा आहे.

काही नवीन सांगण्या-लिहिण्या पेक्षा माझीच पाच-सहा वर्षांपूर्वीची एक पोस्ट पुनः एकदा ताजी करतो.

असो.

ज्या भगवान सांब सदाशिवाने आपल्या अर्धांगिनीच्या कर्णांत गोपनीय कुंडलिनी योग सर्वप्रथम कथन केला तो श्रीकंठ सर्व वाचकांना योगमार्गावर अग्रेसर करो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. सॉफ्टवेअर डेव्हलपर्स साठी अजपा ध्यानाची ओंनलाईन सेशन्स. अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 21 June 2022