Get initiated into Ajapa Dhyana and Kriya. Online guidance and initiation sessions for selected individuals and small groups by Bipin Joshi. More details here.

Untitled 1

सॅाफ्टवेअर डेव्हलपर्ससाठी बुद्धीवर्धक दहा आयुर्वेदिक सोपे उपाय

सॅाफ्टवेअर डेव्हलपमेंट हे असं क्षेत्र आहे की जिथे कायम नवीन-नवीन गोष्टी शिकाव्याच लागतात. एवढंच नाही तर सॅाफ्टवेअर लिहित असतांना सुद्धा पदोपदी मेंदूचा आणि बुद्धीचा कस लागत असतो. त्याच्या जोडीला दैनंदिन जीवनातील ताण-तणाव, चिंता, काळज्या असतातच. या सर्व परिस्थितीवर मात करायची असेल तर सॅाफ्टवेअर डेव्हलपर्सकडे सुदृढ आणि निकोप मेंदू आणि बुद्धी असणे आवश्यक ठरते.

बाजारात आजकाल अनेक बुद्धीवर्धक औषधे उपलब्ध आहेत. परंतु आयुर्वेद आपल्याला अनेक सोपे, निर्धोक, घरगुती उपाय प्रदान करतो जे कोणालाही अंमलात आणणे शक्य आहे. असेच काही सोपे उपाय खाली देत आहे. सॅाफ्टवेअर डेव्हलपर्सनी जरूर लाभ घ्यावा.

  • ५-६ बदाम घ्यावेत आणि त्यांना रात्री पाण्यात भिजवून ठेवावे. सकाळी पाणी काढून टाकावे. बदामांवरील सालं काढून टाकावीत. चांगलं ठेचून त्या बदामांची पेस्ट बनवावी. एक ग्लास गाईचे दुघ घेऊन त्यात ही बदाम पेस्ट आणि दोन चमचे मध मिसळावा. तयार झालेले पेय ३-४ महिने घ्यावे.
  • आवळ्याचा रस १ चमचा घ्यावा. त्यात २ चमचे मध मिसळावा. हे मिश्रण रोज खावे.
  • एक चमचा जटामांसी चूर्ण घेऊन ते एक कप कोमट दुधात मिसळावे. हे मिश्रण रोज एक-दोन वेळा प्यावे.
  • काळी मिरी आणि गायीचे शुद्ध तूप एकत्र मिसळावे आणि त्याचे सेवन करावे.
  • अर्धा ते एक चमचा दालचिनी आणि त्याच प्रमाणात मध एकत्र मिसळावा आणि रोज त्याचे सेवन करावे.
  • अर्धा चमचा शंखपुष्पी एक कप कोमट पाण्यात मिसळावी. हे मिश्रण रोज सेवन करावे.
  • आलं, जिरे आणि खडीसाखर अर्धा-अर्धा चमचा मिसळावे आणि त्याचे रोज सेवन करावे.
  • ब्राह्मीची सात ते दहा पाने धुवून ती कचाकचा नीट चावून खावीत. पानं रोज मिळाली नाहीत तर ब्राह्मीचा एक चमचा रस वापरू शकता.
  • बडीशेप आणि खडीसाखर जाडसर कुटून एक-एक चमचा सकाळ-संध्याकाळ दुध किंवा पाण्याबरोबर घ्यावी.
  • अक्रोडचा आहारात मुबलक वापर करावा. तो बुद्धीवर्धक आहे.

येथे एक लक्षात घ्या की वरील सर्व उपाय हे सर्वसाधारण व्यक्ती डोळ्यासमोर ठेऊन दिलेले आहेत. प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. एखाद्या तज्ञाच्या सल्ल्याने अशी औषधे घ्यावीत हे केंव्हाही श्रेयस्कर आहे.

याबरोबर सर्वात प्रभावी उपाय म्हणजे अजपा योग. अजपा योगात मेंदू, मनोमय कोष आणि विज्ञानमय कोष यांचे शुद्धीकरण अतिशय प्रभावीपणे होत असते. योग्य आहार-विहार, आयुर्वेद आणि अजपा योग यांच्या आधारे सुदृढ मेंदू, तल्लख बुद्धी, उत्तम स्मरणशक्ती इत्यादी फायदे मिळवणे सॅाफ्टवेअर डेव्हलपर्सना सहज शक्य आहे.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून अजपा योग विषयक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 06 Sep 2018
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates