Untitled 1

आत्मसाक्षात्कारासाठी गुरुकृपा आवश्यक

योगसुखाचे सोहळे । सेवकां तुझेनि स्नेहाळे । सोऽहंसिद्धीचे लळे । पाळिसी तूं ॥
आधारशक्तीचिया अंकीं । वाढविसी कौतुकीं । हृदयाकाशपल्लकीं । परीये देसी निजे ॥
प्रत्यक्ज्योतीची वोवाळणी । करिसी मनपवनाचीं खेळणीं । आत्मसुखाची बाळलेणीं । लेवविसी ॥
~ ज्ञानेश्वरी

सुलभ विवरण : गुरुकृपेच्या शक्ती विषयी संत ज्ञानेश्वर म्हणतात - हे स्नेहाळे, तुझ्यामुळे साधाकाला योगसामर्थ्य प्राप्त होते. त्याची "मी ब्रह्म आहे" ही अनुभूती घेण्याची लडिवाळ इच्छा तूच पूर्ण करतेस. कुंडलिनी शक्तीला तू कौतुकाने वाढवतेस अर्थात जागृत करतेस. मग तीला हृदयाकाशाच्या पाळण्यात घालून झोके देतेस. याचा अर्थ असा की कुंडलिनी अनाहत चक्रापर्यंत पोहोचते परिणामी भक्तीचा उल्हास होतो. तूच मन आणि वायू यांची खेळणी साधकाला देतेस. साधक गुरुकृपेने मन आणि वायू यांच्यावर ताबा ठेऊ शकतो. आत्मज्योतीची ओवाळणी करून साधकाला आत्मसुखाचे अलंकार लेववतेस. थोडक्यात याचा अर्थ असा की गुरु कृपा कुंडलिनी जागृतीसाठी आणि आत्मसाक्षात्कारासाठी आवश्यक आहे.



बिपीन जोशी लिखित देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकातींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून अजपा योग विषयक सशुल्क मार्गदर्शन प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.


Posted On : 13 February 2017




Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates