Ajapa Dhyana and Kriya : Online guidance and initiation sessions by Bipin Joshi. Read more...

हठविद्येच्या गोपनीयतेची आवश्यकता

ज्या साधकांना योगसाधनेत सफलता मिळवायची आहे त्यांनी हठविद्या गुप्त ठेवावी कारण गुप्त ठेवल्यास ती फलदायक ठरते आणि प्रगट केल्यास ती निष्फळ होते.
~ हठयोग प्रदीपिका
कुंडलिनी योगमार्गावर हे एक महत्वाचे पथ्य साधकाला पाळावे लागते. गुरुप्रदत्त साधना (मंत्र, क्रिया वगैरे) कोणाजवळही प्रगट करू नयेत असा शास्त्रसंकेत आहे. त्याला अनेक कारणे आहेत. महत्वाचे कारण म्हणजे तुमची साधना ही फक्त "तुमची" असते. अन्य कोणाला ती फळेलच असे नाही. समजा एखाद्या गाईच्या वाटणीचा चारा तुम्ही विहीरीतल्या माशांना टाकलात तर ती गायही उपाशी राहील आणि त्या माशांनाही त्या चार्‍याचा काही उपयोग होणार नाही कारण ते त्यांचे अन्नच नाही. तसाच काहीसा हा प्रकार असतो. दुसरे म्हणजे गुरु साधना देताना ती आपल्या चैतन्याने भारून शुभसंकल्पासह शिष्याला देत असतो. साधना प्रगट केल्याने ह्या संकल्पात कमतरता येते असा संकेत आहे. त्यामुळे दुसर्‍यापुढे आपल्या साधनेचे प्रदर्शन करणे त्याज्य मानले जाते.

लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग मार्गदर्शक आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून अजपा योग विषयक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 08 Dec 2014


Tags : विचार