देवाच्या डाव्या हाती पुस्तक रुपाने प्रकाशित!

नुकतेच माझे 'देवाच्या डाव्या हाती' हे पुस्तक प्रकाशित झाले. काही महिन्यांपूर्वी माझ्या योगविषयक वेब साईटवर माझ्या कुंडलिनी जागृतीच्या अनुभवांवर आधारीत लेखमाला लिहित होतो. तीचेच रुपांतर या पुस्तकात झाले. लेखमालेला वाचकांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला. त्या बद्दल त्यांचे आभार. पुस्तकाविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे. पुस्तकातील काही भाग संक्षिप्त स्वरूपात याच वेब साईटवर उपलब्ध आहे.लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 02 July 2009


Tags : योग अध्यात्म शिव कुंडलिनी चक्रे साधना देवाच्या डाव्या हाती पुस्तके