योगसाधकांसाठी काही सुचना

 • अजपा साधना शक्यतो प्रसन्न जागी करावी. शक्य असल्यास त्या जागी एकांत असावा.
 • साधनेची जागा धूळ, कीटक, डास, आवाज इत्यादींपासून मुक्त असावी.
 • साधनेचे आसन मऊ आणि सुखकारक असावे. अर्थात त्यासाठी बाजारातून किमती "योगा मॅट" आणण्याची गरज नाही. एका कांबळ्याची चौपदरी घडी करावी. त्यावर मऊ सूती पंचाची चौपदरी घडी पसरावी आणि त्यावर साधनेला बसावे.
 • साधनेचे आसन अन्य कशासाठीही वापरू नये वा अन्य कोणालाही वापरायला देऊ नये.
 • साधकाने आपल्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे. मसालेदार, तळलेले पदार्थ टाळावे. पोटाचे चार भाग कल्पून दोन अन्नाने भरावे. एक द्रव पदार्थाने भरावा आणि उरलेला भाग वातासाठी मोकळा ठेवावा. ताजी फळे, भाज्या, गाईचे दूध अशा पदार्थांचा वापर शक्य तेव्हा करावा.
 • अजपा साधेनाला नामस्मरणाची आणि आध्यात्मिक वाचनाची जोड द्यायला काहीच हरकत नाही.
 • साधनेचे फळ तत्काळ मिळण्याची अपेक्षा करू नये. तुमच्या पूर्वकर्मानुसार आणि साधनेच्या तीव्रतेनुसार फळ मिळण्यास कमी-अधिक कालावधी लागू शकतो.
 • आपली तुलना अन्य साधकांबरोबर करू नये. व्यक्ती तितक्या प्रकृती हे लक्षात ठेवावे.
 • तीव्र आजारपणात अथवा मन:स्थीती अत्यंत विचलीत असतांना साधना करू नये.  
 • अध्यात्मामार्गावरचे अनुभव चारचौघांना सांगत बसू नये. गुरूला अथवा मार्गदर्शकाला सांगण्यास हरकत नाही.
 • साधनारत असताना सांसारीक गोष्टींचे चिंतन करत बसू नये. लक्षपूर्वक केलेली साधना पटकन फायदा देते.

लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे संगणक सल्लागार, लेखक आणि योग मार्गदर्शक आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकातींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून योग आणि ध्यान विषयक सशुल्क मार्गदर्शन प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

हा मजकूर श्री. बिपीन जोशी यांच्या 'नाथ संकेंतींचा दंशु' या पुस्तकातून घेण्यात आला आहे. या लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी आजच आपली प्रत विकत घ्या. अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.


Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates