Untitled 1
भगवान दत्तात्रेयांचे सोळा अवतार
मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा म्हणजे भगवान दत्तात्रेयांचे
पृथ्वीवर अवतरण झाले तो दिवस अर्थात श्रीदत्त जयंती. अवधूतमूर्ती
दत्तात्रेयांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे स्वरूप मानतात हे तर सर्वांनाच
माहित आहे. परंतु दत्त संप्रदायात भगवान दत्तात्रेयांचे सोळा अवतार मानण्यात येतात.
परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंद सरस्वती उर्फ
टेंबे स्वामींनी आपल्या श्रीदत्तात्रेय षोडशावतार चरितानि
नामक ग्रंथांत या सोळा अवतारांची कथा आणि उपासना पद्धती विस्ताराने वर्णन केली आहे.
विस्तारभयामुळे ती संपूर्ण उपासना विधी-विधानासहित येथे देणे शक्य नसले तरी आजच्या
पावन दिवशी त्या सोळा अवतारांचे नाममंत्र खाली देत आहे. त्या
नामामंत्रांचा भक्तिपूर्वक केलेला जप किंवा स्मरण सर्वच दत्तभक्तांना उपयोगी ठरेल
यात शंका नाही.
१. ॐ योगिराजाय नमः ।
२. ॐ अत्रिवरदाय नमः ।
३. ॐ दत्तात्रेयाय नमः ।
४. ॐ कालाग्निशमनाय नमः ।
५. ॐ योगिजनवल्लभाय नमः ।
६. ॐ लीलाविश्वंभराय नमः ।
७. ॐ सिध्दराजाय नमः।
८. ॐ ज्ञानसागराय नमः ।
९. ॐ विश्वंभरावधूताय नमः ।
१०. ॐ मायामुक्तावधूताय नमः ।
११. ॐ मायायुक्तावधूताय नमः ।
१२. ॐ आदिगुरवे नमः ।
१३. ॐ शिवरुपाय नमः ।
१४. ॐ देवदेवेश्वराय नमः ।
१५. ॐ दिगंबरावधूताय नमः ।
१६. ॐ श्रीकृष्णश्यामकमलनयनाय नमः ।
सर्व वाचकांना श्रीदत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
हा लेख कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित आहे. कृपया कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रित करू नये.
प्रिय वाचकांनो,
गेली अनेक वर्षे आम्ही आमच्या वेब साईटच्या माध्यमातून योग-अध्यात्म विषयक लेखन प्रसिद्ध करत आहोत.
आम्ही कोणालाही आमचे लेखन अन्यत्र पुनर्मुद्रित करण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिलेली नाही.
तरीही काही लोकांनी आमचे लेखन अन्यत्र (उदा. फेसबुक पेज, व्हॉटस अॅप, ब्लॉग वगैरे) प्रकाशित केल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.
मूळ लेखकाचे नाव आणि या वेब साईटचा दुवा देण्याचे सौजन्यही त्यांनी दाखविलेले नाही.
काहींनी तर आमचे लेखन आपल्या स्वतःच्या नावे प्रसिद्ध केले आहे.
या लोकांनी केलेले हे साहित्य चौर्य अर्थातच निंदनीय आणि खेदजनक आहे.
योग्य वेळ येताच भारतीय कायदा आपले कार्य करेलच परंतु आम्ही आमच्या सुजाण वाचकांना हे सूचित करू इच्छितो
की त्यांनी अशा साहित्य चोरांपासून सावध रहावे.
अशा लोकांशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. ही वेब साईट हे आमचे लेखन प्रसिद्ध होण्याचे एकमेव अधिकृत स्थान आहे.
आम्ही अन्य कोणालाही आमचे लेखन प्रसिद्ध करण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिलेली नाही.
धन्यवाद.
~ वेब टीम