Untitled 1

कौन हमारा इष्ट है

नाथ साहित्यात योगमार्गी शिकवण ही फक्त सूत्रबद्ध ग्रंथांतच भरलेली आहे असे नाही. अगदी वरकरणी असंबद्ध आणि अर्थहीन वाटणाऱ्या शाबरी मंत्रांमध्ये सुद्धा कुंडलिनी योग, प्राण विद्या, आणि नाथ विज्ञानाचे धागेदोरे गुंफलेले आहेत. अशाच एका शाबरी मंत्रात खालील गुरु-शिष्य संवाद आढळतो :

कोण एक नाथ पंथी गुरु रानात भटकता भटकता एका बेसावध क्षणी आपल्या शिष्याच्या ज्ञानाची परीक्षा घेतो. त्याला विचारतो :

कौन के हम शिष्य है ?
कौन हमारा नाम ?
कौन हमारा इष्ट है ?
कौन हमारा गांव ?

शिष्य हुशार असतो. शिकवलेल्या ज्ञानात मुरलेला असतो. लगेच उत्तर देतो :

शबद के हम शिष्य है |
सोहं हमारा नाम |
प्राण हमारा इष्ट है |
काया हमारा गांव |

(शबद म्हणजे शब्द, नाद, नाद ब्रह्म. नाथपंथी योगसाधनेत नाद श्रवण, नाद लय आणि नाद ब्रह्म यांना खुप महत्वाचे स्थान आहे.)

असो.

सर्व वाचकांना आपला "गुरु", "नाम", "इष्ट", आणि "गाव" यांची ओळख होवो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या.

Posted On : 10 December 2018