Kriya and Meditation for Software / IT Professionals. Conducted by Bipin Joshi. Read more...

Untitled 1

सुषुम्ना दर्शन

कुंडलिनी योगमार्गावर जे विलक्षण अनुभव येतात त्यामध्ये "सुषुम्ना दर्शन" ही एक महाद्भुत अशी अनुभूति आहे. जणू शेकडो विजांचा लोळ किंवा सहस्त्र सुर्यांचे तेज. मग योग्यासाठी जप, तप, व्रत, तीर्थ इत्यादि गोष्टींची किंमत शून्य होऊन जाते. कधी केल्याच तर केवळ लोकाचरणार्थ तो अशा गोष्टी करतो. म्हणूनच योगशिखा उपनिषद सांगते -

अश्वमेधसहस्राणी वाजपेयशतानी च।
सुषुम्नाध्यानयोगस्य कलां नार्हंति षोडशम॥

अर्थात हजारो अश्वमेध यज्ञ, शेकडो वाजपेय यज्ञ यांचे फळ सुषुम्नाध्यानयोगाच्या सोळाव्या कले इतकेही नसते.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे संगणक सल्लागार, लेखक आणि योग मार्गदर्शक आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून योग आणि ध्यान विषयक सशुल्क मार्गदर्शन प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 14 Aug 2017