Ajapa Dhyana and Kriya : Online guidance and initiation sessions by Bipin Joshi. Read more...

Untitled 1

अवधूत अयोनी संभव जन्मले...

आज दत्त जयंती आहे. काही जुने स्टुडंटस येणार आहेत आणि मग नंतरचा दिवसही धावपळीचा आहे. त्यामुळे सकाळी नेहमीपेक्षा लवकरच उठणं भाग होतं. उठलो तेच मुळी एक आतून स्फुरलेली, अंतरंगातून आपोआप उमटलेली एक ओवी पुटपुटत. फार काही मोठं काव्य वगैरे नाही. एकच इवलीशी ओवी. असं ईश्वरी प्रेरणेनं आपोआप स्फुरलेले गद्य / पद्य कदाचित व्याकरण किंवा भाषेची शाब्दिक सुंदरता याबाबतीत उणे असेल पण आपल्याला मात्र ते खुप आनंद आणि समाधान देऊन जातं. वर्णमालेच्या रूपाने विराजमान असणाऱ्या जगन्माता कुंडलिनीची ही एक निखळ अभिव्यक्ती असते. त्या देवात्म शक्तीपुढे मग आपण अजूनच नतमस्तक होतो.

त्या ओवीतूनच तुम्हा सर्वाना श्रीदत्त जयंतीच्या शुभेच्छा देतो -- 

शैली शृंगी जटाजूट कंथा |
निर्मावया योग-आगम-निगम पंथा ||
लोकांसी द्यावया अद्वयाची संथा |
अवधूत अयोनी संभव जन्मले ||


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग मार्गदर्शक आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून अजपा योग विषयक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 03 Dec 2017




Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.