Untitled 1

चंद्र, सूर्य, सुषुम्ना नाड्यांचा दैनंदिन कार्यांशी असलेला संबंध

चंद्रनाडी प्रवाहेण सौम्यकार्याणि कारयेत |
सूर्यनाडी प्रवाहेण रौद्रकर्माणि कारयेत |
सुषुम्नायाः प्रवाहेण भुक्ती-मुक्ती फलानि च ||
~  शिव स्वरोदय

सुलभ विवरण : योगशास्त्रात चंद्र नाडी किंवा इडा नाडी, सूर्य नाडी किंवा पिंगला नाडी आणि सुषुम्ना नाडी यांना किती महत्व आहे सांगायची गरज नाही. योगशास्त्रा व्यतिरिक्तही या नाड्यांचा स्वतःचा असा कार्यकारण भाव आहे. प्रत्येक नाडीचा स्वतःचा असा एक स्वभाव आहे. हा स्वभाव ओळखून जर दैनंदिन कार्य केली तर कार्य हातून अधिक सुलभतेने घडतात. अर्थात यातही तारतम्य बाळगायला हवेच. आता नाड्यांचे स्वभाव आणि त्यानुसार करावयाची कर्मे कोणती ते शिवस्वरोदय शास्त्रात विषद केले आहे. शिव स्वरोदय शास्त्रानुसार चंद्र नाडी चालू असतांना सौम्य कार्य करावीत. सौम्य याचा अर्थ ज्यांत खुप अंगमेहनत वगैरे नसेल किंवा मन प्रक्षोभित नसेल. सूर्य नाडी चालू असतांना रौद्र स्वरूपाची म्हणजे कठीण, किचकट कार्य करावीत ज्यांना जोर किंवा उर्जा अधिक लागणार आहे. तर ज्या कार्यांत भोग किंवा मोक्ष आहे ती कार्ये सुषुम्ना चालू असतांना करावी. गंमत बघा की एकच सुषुम्ना नाडी दोन परस्पर विरुद्ध प्रकारच्या कार्यांसाठी सांगितली आहे. कारण सुषुम्ना चालू असतांना चंद्र आणि सूर्य समसमान असतात. परिणामी कोणतेही टोक न गाठता सुवर्णमध्य साधला जातो. आध्यात्मिक प्रगतीसाठी, कुंडलिनी जागृत झाली की ती सुषुम्ने मधून नेली जाते परिणामी मुक्तीचे द्वार साधकासाठी उघडले जाते.बिपीन जोशी लिखित देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकातींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून अजपा योग विषयक सशुल्क मार्गदर्शन प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.


Posted On : 20 February 2017
Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates