अजपा योग - साधना आणि सिद्धी
संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक बिपीन जोशी यांच्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशू या पुस्तकांची संलग्न वेब साईट. या दोन्ही पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून अजपा योग विषयक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

नुकतेच प्रकाशित झालेले लेख

आत्म्याचे आणि वैराग्याचे मिलन
आज संध्याकाळी मकर संक्रांत सुरु होत आहे. ही वेळ उशीराची असल्याने शास्त्रानुसार मकर संक्रांत उद्या साजरी होणार आहे. एखाद्या चांगल्या दिनदर्शिकेत तुम्हाला संक्रांतीचा पुण्यकाळ सहज मिळून जाईल. अनेक ठिकाणी ग्रहगोलांच्या दृष्टीने मकर संक्रांत म्हणजे काय त्याचे विश्लेषण केलेलेही तुम्हाला वाचायला, पहायला मिळेल. मी येथे त्या विस्तारात जाणार नाही. परंतु अजपा साधकांसाठी काही महत्वाच्या गोष्टी जरूर सांगीन.
Posted On : 14 Jan 2019
साधकासाठी गुणग्राहीपणा आणि विवेक आवश्यक
श्रीमदभागवतामध्ये अवधूत दत्तात्रेय आणि यदु राजा यांचा संवाद फार रोचक आहे. अवधूत दत्तात्रेयांचे तेजस्वी स्वरूप पाहून यदु राजा प्रभावित होतो. दत्तात्रेयांना शरण जाऊन त्यांच्या गुरुंविषयी विनयपूर्वक विचारणा करतो. त्याला उत्तर म्हणून अवधूत शिरोमणी त्याला आपले २४ गुरु कोण ते सांगतात. त्यांच्या संवादातून आपल्याला एक फार महत्वाची गोष्ट शिकता येते. उद्धवाने श्रीकृष्णाकडे जेंव्हा संन्यास आणि वैराग्याचा उपदेश मागितला तेंव्हा श्रीकृष्णाने हाच संवाद उद्धवाला ऐकवला.
Posted On : 07 Jan 2019
चिदंबर आणि दिगंबर
काही दिवसांपूर्वीची गोष्ट. उन्हात गाईच्या दुधात कालवलेल्या भस्माचे गोळे सुकवत ठेवले होते. श्रीदत्त जयंती येतेच आहे थोड्या दिवसांत. शैव मार्गात रुद्राक्षाप्रमाणेच भस्म अथवा विभूतीलाही महत्वाचे स्थान आहे. दैनंदिन जीवनात रोज जरी अंगभर लावणे शक्य झाले नाही तरी शिवपुजनात आणि काही शैवपंथी / नाथपंथी साधनांत विभूतीचा वापर हमखास होतोच. वैराग्याची सदैव आठवण करून देणारी विभूती! ते गोळे सारखे करायला गेलो तो सहज आकाशाकडे लक्ष गेले. लख्ख अथांग निळाई जणू या विश्वाला अलगद कवेत उचलून घेत आहे असं वाटत होतं.
Posted On : 17 Dec 2018
कौन हमारा इष्ट है
नाथ साहित्यात योगमार्गी शिकवण ही फक्त सूत्रबद्ध ग्रंथांतच भरलेली आहे असे नाही. अगदी वरकरणी असंबद्ध आणि अर्थहीन वाटणाऱ्या शाबरी मंत्रांमध्ये सुद्धा कुंडलिनी योग, प्राण विद्या, आणि नाथ विज्ञानाचे धागेदोरे गुंफलेले आहेत. अशाच एका शाबरी मंत्रात खालील गुरु-शिष्य संवाद आढळतो.
Posted On : 10 Dec 2018
सुकृत आणि दुष्कृत
फार जुनी गोष्ट. एकदा गोरक्षनाथ एका गावाहून दुसऱ्या भटकंती करत होते. वाटेत एके ठिकाणी त्यांना एक गांजा विकणाऱ्या व्यापाऱ्याचे दुकान दिसले. ते त्या गांजा विकणाऱ्याकडे गेले. म्हणाले एक तोळा दे. दुकानदार गोरक्षनाथांच्या अंगावर खेकसला.
Posted On : 03 Dec 2018
जीवो जीवस्य जीवनम्
गेल्या शनिवारची गोष्ट. एका जुन्या घराच्या खिडकीत मी उभा होतो. घराच्या मागे थोडी झाडी आहे म्हणून जरा न्याहाळत निवांत उभा होतो. एका मोठ्या झाडाची लांबलचक फांदी माझ्या बरोब्बर समोर होतो. त्या फांदीवर सकाळचे मस्त कोवळे उन पडले होते. काही मिनिटांनी त्या फांदीवर एक इवलीशी खार खाद्य शोधत शोधत आली. ती ओरडतांना तिची गोंडेदार शेपटी लयबद्ध पद्धतीने वर खाली होत होती. आपल्याच शोधात गर्क असलेली खारुताई त्या मोठ्या फांदीवर बागडत होती. कोवळ्या स्वच्छ उन्हात तिच्या पाठीवरील रामाची शाबासकी मोठी सुंदर आणि तजेलदार दिसत होती.
Posted On : 26 Nov 2018
इच्छापूर्ती मंत्र आणि प्रत्यक्षीकरण मंत्र
भारतीय जनमानसावर प्राचीन काळापासूनच मंत्र आणि मंत्रशक्ती यांचा एक अद्भुत पगडा बसलेला आपल्याला दिसून येतो. आजच्या विज्ञानयुगातही तो कमी झालेला दिसत नाही. अध्यात्ममार्गावर बहुतेक साधकांची पहिली साधना काय असते तर कोणत्यातरी मंत्राचा जप करणे. घरात अथवा देवळात अशी जपमाळा फिरवणारी मंडळी आपण नेहमी पहातो. आता या मंत्रांनी खरोखर काही फायदा होतो का हा ज्याच्या त्याच्या विश्वासाचा आणि श्रेद्धेचा भाग आहे.
Posted On : 19 Nov 2018
स्वतःच्या सद्गुरूंना ओळखा
कार्तिक शुद्ध दुर्गाष्टमी (या आठवड्यात १६ नोव्हेंबर २०१८ रोजी) म्हणजे सद्गुरू श्रीशंकर महाराजांचा प्रगट दिन. महाराज वेशभूषेने नसले तरी मनाने नाथपंथी होते. त्यांचे भक्त त्यांना भगवान श्रीशंकराचा अवतार मानतात. या अवलियाच्या आयुष्यातील अनेक लीला प्रसंग आपल्याला थक्क तर करून टाकतातच पण त्याही पेक्षा जास्त अंतर्मुख करून सोडतात. असाच एक छोटा पण फार उद्बोधक प्रसंग...
Posted On : 12 Nov 2018
योग्यासाठी तपश्चर्या आवश्यक
मच्छिंद्रनाथांनी बद्रिकाश्रमात बारा वर्षे तपाचरण केले. योग्य वेळ आल्यावर त्यांची आणि भगवान दत्तात्रेयांची गाठ पडली. दत्तात्रेयांनी त्यांना शिष्य म्हणून स्वीकारले. त्यांना दीक्षा दिली आणि सर्व प्रकारच्या विद्या शिकवल्या. गंमत बघा की खरंतर मच्छिंद्रनाथ म्हणजे अवतारी सत्पुरुष. मच्छिंद्रनाथांनी आपल्या जन्मापूर्वीच मच्छीच्या पोटातूनच गुढातीगुढ आणि योगीगम्य असे शंकर-पार्वती संभाषण श्रवण केले होते. त्याचे आकलनही त्यांना झाले होते. परंतु तरीही त्यांनी तब्बल बारा वर्षे तपाचरण अंगिकारले.
Posted On : 01 Nov 2018
मच्छिंद्रनाथांचा कौलाचार
नाथ पंथाचा आचार-विचार म्हटलं की लोकांना गोरक्षनाथांचा सिद्ध-सिद्धांत-पद्धती आठवतो. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक असणाऱ्या गोरक्षनाथांनी लिहिलेला सिद्ध-सिद्धांत-पद्धती हा नाथ पंठीयांसाठी प्रमाणग्रंथ आहे हे खरेच परंतु नाथ संप्रदायाचा सखोल अभ्यास केल्यास आपल्याला त्याची पाळेमुळे मच्छिंद्रनाथांच्या मूळ पंथाशी अर्थात कौलमार्गाशी घेऊन जातात. कौलामार्गाचे जे आ
Posted On : 10 Oct 2018

देवाच्या डाव्या हाती
कशी होते कुंडलिनी जागृती? जागृती नंतर पूढे काय? प्राचीन योगग्रंथात उल्लेखलेले अनुभव आजही खरोखरच येतात का? या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारे अनुभव कथन. एक नवखा साधक ते योगी या प्रवासात लेखकाला आलेल्या अडचणी आणि त्याने मोठ्या जिद्दीने त्यांवर केलेली मात याचे प्रभावी वर्णन या पुस्तकात आढळते. लेखक बिपीन जोशी यांचे विस्मयकारक स्वानुभव आणि प्रभावी मार्गदर्शन. अधिक वाचण्यासाठी येथे जा.
नाथ संकेतींचा दंशु
कुंडलिनी योगमार्ग विनाकारण गुढतेच्या आणि क्लिष्टतेच्या वलयात झाकोळला गेला आहे. सर्वसामान्य संसारी साधक कुंडलिनी योगमार्गापासून दूरच राहिला आहे. सर्वसामान्य साधकाला समजतील, जमतील आणि फायदा मिळवून देतील अशी मूलतत्वे आणि साधना यांचे सहज सोप्या भाषेत विश्लेषण करणे हे या पुस्तकाचे मुख्य उद्दीष्ट आहे. लेखक बिपीन जोशी यांचे प्रभावी आणि स्वानुभवाधिष्ठित मार्गदर्शन. अधिक माहितीसाठी येथे जा.

Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates